सूचना

या ब्लॉग वरील सर्व पोस्ट ह्या फेसबुक व इंटरनेट जगातील वरील आहेत..
हा ब्लॉग फक्त मराठी कविता आणि विचार संग्रहाच्या संकलनासाठी तयार केलेला आहे

मित्रपरिवार

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

दिवाळी शुभेच्छा १

diwali 1 दिवाळी १
diwali,marathi diwali,diwali marathi,dipawali,diwali,मराठी ,शुभ दिवाळी ,दिवाळी ,दीपावली

साडेतीन मुहूर्त

साडेतीन मुहूर्त


वर्षातील साडेतीन मुहूर्त

  1. वर्षप्रतिपदा - पूर्ण मुहूर्त
  2. विजयादशमी पूर्ण मुहूर्त
  3. बलिप्रतिपदा - अर्धा मुहूर्त
  4. अक्षय्य तृतीया - पूर्ण मुहूर्त

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

विजयादशमीला (दसर्‍याला) देवीचे पूजन करण्याचे महत्त्व

देवतेचे पूजन करतांना पूजनातील कृतींचे शास्त्र कळले, तर त्या कृतींचे महत्त्व लक्षात येऊन पूजन अधिक श्रद्धेने होते. श्रद्धेतूनच भावाचा जन्म होतो आणि भावपूर्ण कृतीमुळे देवतेच्या तत्त्वाचा लाभ अधिक होतो. तसेच देवपूजेची कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरीत्या केल्यास त्यातून मिळणारे फळ अधिक असते. त्यानिमित्त सरस्वती पूजन अन् अपराजिता देवीचे पूजन यांविषयी माहिती पाहूया. सरस्वती पूजन करणे


    ‘दसर्‍याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन त्याचा स्थिरतेत प्रवेश होण्यास मदत होते.

अपराजिता देवीचे पूजन करणे
अपराजितापूजन : ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कमरेत चकाकणारी सुवर्णमेखला आहे अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो.
    काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.
१.    भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवणे, हे अपराजिता या शक्तीतत्त्वाची आठही दिशांवर विजय प्राप्त करण्याची क्षमता दर्शवण्याचे प्रतीक असणे : अपराजिता हे दुर्गादेवीचे मारक रूप पृथ्वीतत्त्वाच्या आधारे भूगर्भातून प्रकट होऊन पृथ्वीवरील जिवांसाठी कार्य करते. अष्टदलाच्या सिंहासनावर आरूढ झालेले हे त्रिशूलधारी रूप शिवाच्या संयोगाने दिक्पाल आणि ग्रहदेवता यांच्या साहाय्याने आसुरी शक्तींचा नाश करते.
     अष्टदलावर आरूढ झालेल्या अपराजिता या शक्तीतत्त्वाची भक्ताच्या प्रार्थनेनुसार ज्या वेळी पृथ्वीच्या भूगर्भिंबदूतून उत्पत्ती होते, त्या वेळी तिच्या स्वागतासाठी अष्टपाल देवतांचेही आगमन होते. अष्टदलाचे अग्रबिंदू हे अष्टपाल देवतांचे प्रतिनिधित्व करतात. अपराजितेच्या उत्पत्तीतून प्रक्षेपित होणार्‍या मारक लहरी या अष्टपालांच्या माध्यमातून अष्टदिशांना तांबूस रंगाच्या प्रकाशलहरींच्या माध्यमातून प्रक्षेपित केल्या जाऊन त्या त्या कोनात संपुटित झालेल्या रज-तमात्मक शक्तीचा नाश करतात आणि पृथ्वीवरील जिवांना निर्विघ्नपणे जीवन जगता येण्यासाठी वायूमंडलाची शुद्धी करतात.
२.    शमीपत्र हे तेजाचे उत्तम संवर्धक असल्याने शमीच्या झाडाजवळ श्री दुर्गादेवीच्या अपराजिता या रूपाची पूजा केली जाणे : शमीच्या झाडाजवळ श्री दुर्गादेवीच्या अपराजिता या रूपाची पूजा केली जाते; कारण शमीपत्र हे तेजाचे उत्तम संवर्धक असल्याने अपराजिता या रूपाची कारंजाप्रमाणे प्रकट झालेली शक्ती दीर्घकाळ साठवून ठेवण्याचे कार्य शमीपत्र करते. हे शमीपत्र घरात ठेवून या लहरींचा फायदा वर्षभर मिळवणे यामुळे जिवांना शक्य होते.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ : देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र )
‘ईश्वरी राज्य’ हा शब्द सनातनमध्ये प्रचलित होण्यामागील इतिहास !

दसर्‍याच्या दिवशी परंपरेने करावयाच्या धार्मिक कृती आणि सद्यस्थितीत करावयाच्या प्रार्थना !

सीमोल्लंघन
सीमोल्लंघन
अपराण्हकाली (तिसर्‍या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमी वृक्ष किंवा आपटा असेल, तिथे थांबतात. सध्या समाज प्रेतवत बनला आहे. या क्षात्रधर्महीन मानसिकतेचे सीमोल्लंघन करून क्षात्रधर्म साधनेसाठीचे आवश्यक गुण आत्मसात करणे गरजेचे आहे.
shami
शमीपूजन
आपटा या दिवशी शमीची पूजा करतात. प्रार्थना तिची पुढीलप्रमाणे प्रार्थना करूया, ‘शमी पाप शमवते. शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी दुर्जनांच्या नाशासाठी व ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी क्षात्रधर्माच्या लढ्यास सिद्ध होत आहे. या लढ्यात तू मला विजयी कर.’
आपट्याची पूजा
या दिवशी आपट्याची पूजा करतात. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदुळ, सुपारी व सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा करून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. प्रार्थना या वेळी अशी प्रार्थना करूया, ‘हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. भ्रष्टाचार, जात्यंधता, निष्क्रीयता या समाजपुरुषाच्या महादोषांचे तू निवारण कर.’
शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वहातात व इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.
अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात. प्रार्थना ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या लढ्यात आम्ही अपराजित होवो, विजयी होवो यासाठी तिची प्रार्थना करूया.
शस्त्रपूजनशस्त्रपूजा
या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे साफसूफ करून ती ओळीने मांडत अन् त्यांची पूजा करत. आता राजे नाहीत. शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात.

दसर्‍याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्यामागील शास्त्र काय ?

(दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह असणे)

     दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते. या दिवशी शस्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्तीला आवाहन करून स्वतःत वायुमंडलात वेगाने तळपत असणार्‍या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्रतेजाची निर्मिती करून घ्यावयाची असते.
दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात असणार्‍या श्रीराम व हनुमान या तत्त्वांच्या लहरींच्या आधिक्यामुळे त्या त्या तत्त्वांचे शस्त्ररूपी प्रतीकात क्षात्रतेजाच्या आधारे संवर्धन होऊन त्यातून शस्त्राच्या अग्रभागातून वेगाने कारंजाप्रमाणे वायुमंडलात प्रक्षेपण होते. क्षात्रतेजाच्या प्रक्षेपणामुळे जिवांत क्षात्रभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्त होऊन येणार्‍या प्रत्येक अडथळ्यांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणे शक्य होते; म्हणून दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह ठरते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या मध्यमातून, २८.९.२००५, सायं. ५.५९)

दसरा

दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात, नियंत्रणात आलेल्या असतात; म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गुण, वगैरेंवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो; त्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा, विजयादशमी इत्यादी नावे आहेत.
हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी नाव आहे. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस, असेही मानतात. काही घराण्यांतले नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.
या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा आहे. आपट्याची पाने हे आप आणि तेज ही तत्त्वे ग्रहण करू शकतात. ही पाने एकमेकांना देतात तेव्हा व्यक्तीच्या हातावरील देवतांची केंद्र असलेले बिंदु कार्यरत होतात आणि त्या तत्त्वाचा लाभ त्या व्यक्तीला होतो. सोने हे लहानांनी मोठ्यांना देण्याचा संकेत आहे. हे सोने देवालाही वाहतात.
हा विजयाचा पराक्रमाचा सण आहे. प्रारंभी हा एक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पीक घरात आणल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत. पुढे याच सणाला धार्मिक रूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

ध्यास मराठी श्वास मराठी