सूचना

या ब्लॉग वरील सर्व पोस्ट ह्या फेसबुक व इंटरनेट जगातील वरील आहेत..
हा ब्लॉग फक्त मराठी कविता आणि विचार संग्रहाच्या संकलनासाठी तयार केलेला आहे

मित्रपरिवार

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

दसर्‍याच्या दिवशी परंपरेने करावयाच्या धार्मिक कृती आणि सद्यस्थितीत करावयाच्या प्रार्थना !

सीमोल्लंघन
सीमोल्लंघन
अपराण्हकाली (तिसर्‍या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमी वृक्ष किंवा आपटा असेल, तिथे थांबतात. सध्या समाज प्रेतवत बनला आहे. या क्षात्रधर्महीन मानसिकतेचे सीमोल्लंघन करून क्षात्रधर्म साधनेसाठीचे आवश्यक गुण आत्मसात करणे गरजेचे आहे.
shami
शमीपूजन
आपटा या दिवशी शमीची पूजा करतात. प्रार्थना तिची पुढीलप्रमाणे प्रार्थना करूया, ‘शमी पाप शमवते. शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी दुर्जनांच्या नाशासाठी व ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी क्षात्रधर्माच्या लढ्यास सिद्ध होत आहे. या लढ्यात तू मला विजयी कर.’
आपट्याची पूजा
या दिवशी आपट्याची पूजा करतात. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदुळ, सुपारी व सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा करून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. प्रार्थना या वेळी अशी प्रार्थना करूया, ‘हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. भ्रष्टाचार, जात्यंधता, निष्क्रीयता या समाजपुरुषाच्या महादोषांचे तू निवारण कर.’
शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वहातात व इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.
अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात. प्रार्थना ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या लढ्यात आम्ही अपराजित होवो, विजयी होवो यासाठी तिची प्रार्थना करूया.
शस्त्रपूजनशस्त्रपूजा
या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे साफसूफ करून ती ओळीने मांडत अन् त्यांची पूजा करत. आता राजे नाहीत. शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा