सूचना

या ब्लॉग वरील सर्व पोस्ट ह्या फेसबुक व इंटरनेट जगातील वरील आहेत..
हा ब्लॉग फक्त मराठी कविता आणि विचार संग्रहाच्या संकलनासाठी तयार केलेला आहे

मित्रपरिवार

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

दसरा

दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात, नियंत्रणात आलेल्या असतात; म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गुण, वगैरेंवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो; त्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा, विजयादशमी इत्यादी नावे आहेत.
हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी नाव आहे. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस, असेही मानतात. काही घराण्यांतले नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.
या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा आहे. आपट्याची पाने हे आप आणि तेज ही तत्त्वे ग्रहण करू शकतात. ही पाने एकमेकांना देतात तेव्हा व्यक्तीच्या हातावरील देवतांची केंद्र असलेले बिंदु कार्यरत होतात आणि त्या तत्त्वाचा लाभ त्या व्यक्तीला होतो. सोने हे लहानांनी मोठ्यांना देण्याचा संकेत आहे. हे सोने देवालाही वाहतात.
हा विजयाचा पराक्रमाचा सण आहे. प्रारंभी हा एक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पीक घरात आणल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत. पुढे याच सणाला धार्मिक रूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा