देवतेचे पूजन करतांना पूजनातील
कृतींचे शास्त्र कळले, तर त्या कृतींचे महत्त्व लक्षात येऊन पूजन अधिक
श्रद्धेने होते. श्रद्धेतूनच भावाचा जन्म होतो आणि भावपूर्ण कृतीमुळे
देवतेच्या तत्त्वाचा लाभ अधिक होतो. तसेच देवपूजेची कृती
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरीत्या केल्यास त्यातून मिळणारे फळ अधिक
असते. त्यानिमित्त सरस्वती पूजन अन् अपराजिता देवीचे पूजन यांविषयी माहिती
पाहूया.
सरस्वती पूजन करणे
‘दसर्याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन त्याचा स्थिरतेत प्रवेश होण्यास मदत होते.

अपराजिता देवीचे पूजन करणे
अपराजितापूजन : ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कमरेत चकाकणारी सुवर्णमेखला आहे अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो.
काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.
१. भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवणे, हे अपराजिता या शक्तीतत्त्वाची आठही दिशांवर विजय प्राप्त करण्याची क्षमता दर्शवण्याचे प्रतीक असणे : अपराजिता हे दुर्गादेवीचे मारक रूप पृथ्वीतत्त्वाच्या आधारे भूगर्भातून प्रकट होऊन पृथ्वीवरील जिवांसाठी कार्य करते. अष्टदलाच्या सिंहासनावर आरूढ झालेले हे त्रिशूलधारी रूप शिवाच्या संयोगाने दिक्पाल आणि ग्रहदेवता यांच्या साहाय्याने आसुरी शक्तींचा नाश करते.
अष्टदलावर आरूढ झालेल्या अपराजिता या शक्तीतत्त्वाची भक्ताच्या प्रार्थनेनुसार ज्या वेळी पृथ्वीच्या भूगर्भिंबदूतून उत्पत्ती होते, त्या वेळी तिच्या स्वागतासाठी अष्टपाल देवतांचेही आगमन होते. अष्टदलाचे अग्रबिंदू हे अष्टपाल देवतांचे प्रतिनिधित्व करतात. अपराजितेच्या उत्पत्तीतून प्रक्षेपित होणार्या मारक लहरी या अष्टपालांच्या माध्यमातून अष्टदिशांना तांबूस रंगाच्या प्रकाशलहरींच्या माध्यमातून प्रक्षेपित केल्या जाऊन त्या त्या कोनात संपुटित झालेल्या रज-तमात्मक शक्तीचा नाश करतात आणि पृथ्वीवरील जिवांना निर्विघ्नपणे जीवन जगता येण्यासाठी वायूमंडलाची शुद्धी करतात.
२. शमीपत्र हे तेजाचे उत्तम संवर्धक असल्याने शमीच्या झाडाजवळ श्री दुर्गादेवीच्या अपराजिता या रूपाची पूजा केली जाणे : शमीच्या झाडाजवळ श्री दुर्गादेवीच्या अपराजिता या रूपाची पूजा केली जाते; कारण शमीपत्र हे तेजाचे उत्तम संवर्धक असल्याने अपराजिता या रूपाची कारंजाप्रमाणे प्रकट झालेली शक्ती दीर्घकाळ साठवून ठेवण्याचे कार्य शमीपत्र करते. हे शमीपत्र घरात ठेवून या लहरींचा फायदा वर्षभर मिळवणे यामुळे जिवांना शक्य होते.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ : देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र )
‘ईश्वरी राज्य’ हा शब्द सनातनमध्ये प्रचलित होण्यामागील इतिहास !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा